google.com, pub-7099045890888503, DIRECT, f08c47fec0942fa0 One women jump of train to save her child 2024 | एका महिलेने आपल्या मुलाला वाचवण्यासाठी धावत्या ट्रेनमधून उडी मारली. -

One women jump of train to save her child 2024 | एका महिलेने आपल्या मुलाला वाचवण्यासाठी धावत्या ट्रेनमधून उडी मारली.

One women jump of train to save her child 2024 | एका महिलेने आपल्या मुलाला वाचवण्यासाठी धावत्या ट्रेनमधून उडी मारली

One women jump of train to save her child 2024 | एका महिलेने आपल्या मुलाला वाचवण्यासाठी धावत्या ट्रेनमधून उडी मारली.

रेल्वे मध्ये चढताना गर्दीत हात निसटून प्लॅटफॉर्म वर राहिलेल्या आपल्या छोट्या मुलासाठी धावत्या रेल्वेतून  उडी मारण्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे.

सोशल मीडियावरील युजर रचित जैन लिहितात की,”माझ्या बहिणीकडे मुलाला सुरक्षित परत आणण्यासाठी चालत्या रेल्वेतून उडी मारण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय नव्हता.आणि यामुळेच तिला खूप जखमा सुद्धा झाल्या.”

त्या व्यक्तीने ट्विटर वर रेल्वेच्या आतील एक भयंकर फोटो शेअर केला आहे. तो म्हणाला की माझ्या बहिणीकडे धावत्या रेल्वेतून उडी मारल्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय शिल्लक राहिला नव्हता कारण तिचा मुलगा स्टेशनवरच राहिला होता.

ते पुढे असे म्हणाले की हे सगळं 3 एसी कोच मध्ये प्रवास करत असताना झाले. त्यांनी प्रवेश स्थानकावरील प्रवेश पत्राचा फोटो शेअर केला आहे आणि सांगितले की लोकांच्या प्रचंड गर्दीमुळे माझ्या बहिणीला रेल्वेमध्ये चढणे अशक्यप्राय झाले होते. प्रवाशांनी खचाखच भरलेल्या या रेल्वेत ती कशीबशी चढली परंतु रेल्वेमध्ये चढल्यावर तिच्या लक्षात आले की तिच्या मुलाचा हात तिच्या हातातून निसटून गेला आहे व तो स्टेशनवरच राहिला आहे. तिने घाई घाई रेल्वेमधून उतरण्याचा प्रयत्न केला परंतु गर्दीमुळे तिला बाहेर पडता आले नाही.

सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

रचित पुढे असे म्हणतात की,मुलाला सुरक्षित परत आणण्यासाठी माझ्या बहिणीला रेल्वेमधून बाहेर पडणे गरजेचे होते परंतु प्रवाशांनी तुडुंब असलेल्या गर्दीत तिला बाहेर पडता आले नाही तरी गर्दीची तमा न बाळगता तिने रेल्वेच्या दरवाजा जवळ येऊन धावत्या रेल्वेतून उडी घेतली. यामुळे तिला खूप जखमा सुद्धा झाल्या आहेत. तिला तात्काळ तिथल्या स्थानिक दवाखान्यात नेऊन तिच्यावर उपचार केले.

उपचारानंतर त्या असे म्हणाल्या की, मी आठ दिवस आधीच एसी कोच चे बुकिंग केले होते. त्यादिवशी जेव्हा मी माझ्या मुलाला घेऊन स्टेशनवर गेले तेव्हा तिथे प्रचंड गर्दी होती. प्लॅटफॉर्मवर रेल्वे आल्यानंतर जागा मिळण्यासाठी प्रवाशांची चढाओढ सुरू झाली होती. एसी कोचला आधीच बुकिंग असल्याकारणाने तिकडे गर्दी नसेल असे मला वाटले परंतु त्या डब्यातही चढण्यासाठी खूप गर्दी होती. मी सामान व मुलाला एका हाताला धरून त्या गर्दीत चढण्याचा प्रयत्न केला धक्काबुक्कीमुळे मी वरती चढले परंतु मुलाचा हात माझ्या हातून निसटला व तो फलाटावरच राहिला. त्याला घेण्यासाठी मी मागे वळाले परंतु प्रवाशांनी दरवाजातच इतकी गर्दी केली होती की मला उतरता आले नाही मी वारंवार विनंती करू नये मला कोणीही उतरू दिले नाही तितक्यात रेल्वे सुरू झाली व सगळे प्रवासी आत आले.

शेवटी नाईलाजाने मला दरवाज्यापाशी येऊन चालत्या रेल्वेतून उडी टाकावी लागली. झालेल्या प्रकारामुळे मुलगा भेदरलेल्या अवस्थेत होता. या गोष्टीकडे रेल्वे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी त्या महिलेच्या सर्व नातेवाईकांनी केली आहे आणि विना प्रवास प्रवास करणाऱ्या त्या सर्व प्रवाशांवर कारवाई झाली नाही तर मंत्रालयापर्यंत धाव घेणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

 

रेल्वे प्रशासनाचा निष्काळजीपणा

ते पुढे असे म्हणतात की, विना तिकीट प्रवास करणारे अनाधिकृत प्रवासी रेल्वेमध्ये जागा अडवतात आणि त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जाते. वातानुकूलित रेल्वेच्या डब्यामध्ये बहुतांश वेळा आधीच बुकिंग केलेले असते तरीही स्थानिक प्रवासी प्लॅटफॉर्मवर रेल्वे आल्यावर या  वातानुकूलित डब्यात चढतात  त्यामुळे प्रचंड गर्दी होते व लांबच्या  प्रवाशांना याचा खूप त्रास होतो. ही बाब जरी गंभीर असली तरी रेल्वे प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झाल्याचे समोर आले आहे.या अराजक स्थितीला आटोक्यात आणण्यासाठी रेल्वे प्रशासनाने अशावेळी पोलीस किंवा तिकीट तपासण्यास असणाऱ्या अधिकाऱ्यांना तात्काळ पाठवले पाहिजे.

 कठोर कारवाईची आवश्यकता

सगळ्या रेल्वे  प्रवाशांना सुरक्षित आरामदायी प्रवासासाठी अशा गोष्टींना तात्काळ प्रतिबंध करणे गरजेचे आहे. कारण तिकीट काढून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यात शौचालयासारख्या महत्त्वाच्या सुविधा वापरू न शकणाऱ्या गोष्टींचा सुद्धा समावेश आहे.

नातेवाईकांच्या संतप्त प्रतिक्रिया One women jump of train to save her child 2024 | एका महिलेने आपल्या मुलाला वाचवण्यासाठी धावत्या ट्रेनमधून उडी मारली.

झालेल्या प्रकारावरून त्या महिलेच्या  नातेवाईकांनी तीव्र नाराजी दर्शवली आहे. एसी कोच चे बुकिंग करून सुद्धा त्यात विना तिकीट प्रवासी प्रवास करून गर्दी करत असतील तर रेल्वे मंत्रालयाने या गोष्टीची तात्काळ दखल घ्यावी अशी मागणी त्या महिलेच्या नातेवाईकांनी केली आहे. रेल्वेच्या प्रवासात ही गोष्ट नवीन नाही. अशा गोष्टी वारंवार घडत आहेत तरीही रेल्वे प्रशासन याकडे सोयीस्कर रित्या दुर्लक्ष करत आहे आणि त्यामुळे प्रवाशांचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे झालेल्या प्रकारात आढळलेल्या दोषींवर त्वरित कारवाई व्हावी तसेच सदर महिलेला झालेल्या त्रासाबद्दल नुकसान भरपाई रेल्वे प्रशासनाकडून मिळावी अशी मागणी त्या महिलेच्या नातेवाईकांकडून होत आहे.

 

Table of Contents

2 thoughts on “One women jump of train to save her child 2024 | एका महिलेने आपल्या मुलाला वाचवण्यासाठी धावत्या ट्रेनमधून उडी मारली.”

Leave a comment