google.com, pub-7099045890888503, DIRECT, f08c47fec0942fa0 Prime Minister Modi Praised Electro Bond | राहुल गांधी म्हणाले ही तर वसुली स्कीम 0 -

Prime Minister Modi Praised Electro Bond | राहुल गांधी म्हणाले ही तर वसुली स्कीम 0

Prime Minister Modi Praised Electro Bond | राहुल गांधी म्हणाले ही तर वसुली स्कीम

पंतप्रधान मोदींनी केली इलेक्ट्रॉल बॉण्ड ची प्रशंसा, राहुल गांधी म्हणाले ही तर वसुली स्कीम 

Prime Minister Modi Praised Electro Bond | राहुल गांधी म्हणाले ही तर वसुली स्कीम 

भारतात निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत. सर्व पक्षांच्या नेत्यांच्या जनसभा, मुलाखती, रॅली जोरदार चालू आहेत. याच दरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी यांनी समाचार एजन्सी एन आईला जवळजवळ सव्वा तास मुलाखत दिली जी जवळजवळ सर्व चॅनलने प्रसारित केली. 

या मुलाखतीत पंतप्रधान मोदी यांनी राम मंदिर, सनातन धर्म, दक्षिणेतील राजकारण आणि त्यांची विदेश नीती अशा प्रकारच्या खूप मुद्द्यांवर चर्चा केली परंतु इलेक्ट्रॉल बॉण्डवर ते जे बोलले त्याची सर्वत्र चर्चा होत आहे. 

इलेक्ट्रॉल बॉण्ड बद्दल ते म्हणाले की त्यांच्या सरकारने इलेक्ट्रॉल बोंड आणला नसता तर मनी ट्रेल चा शोधच लागला नसता. देशामध्ये निवडणुकांच्या आधी इलेक्ट्रॉल बॉण्डच्या संदर्भात समोर आलेली माहिती हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. 

फेब्रुवारीमध्ये सुप्रीम कोर्टाने इलेक्ट्रॉल बॉण्ड स्कीमला असंवैधानिक ठरवत त्याच्या खरेदीसाठी असणाऱ्या अधिकृत बँक स्टेट बँक ऑफ इंडिया ला निर्देश दिले की इलेक्ट्रॉल बॉण्डची खरेदी कोणी केली आणि किती राजनैतिक पार्ट्यांना तो मिळाला याची माहिती देण्यात यावी. 

यानंतर जी माहिती समोर आली त्यानुसार 6060.51 करोड राशी फक्त भारतीय जनता पार्टीला मिळाली. तसेच दुसऱ्या क्रमांकावर टीएमसी होती ज्यांना 1609 करोड धनराशी मिळाली. 

ज्या गोष्टी या माहिती द्वारे समोर आल्यात त्यात असे नमूद आहे की काही कंपन्यांनी जी धनराशी दिली आहे त्यावर काही दिवसांपूर्वी  ईडीने कारवाई केली होती. 

जे आज बोलतात त्यांना उद्या पश्चाताप होईलमोदी 

Prime Minister Modi Praised Electro Bond | राहुल गांधी म्हणाले ही तर वसुली स्कीम 

एन आय च्या मुलाखतीत इलेक्ट्रॉ बॉण्डच्या संदर्भात बोलताना पंतप्रधान मोदीजींना प्रश्न विचारला गेला तेव्हा ते म्हणाले की निवडणुकीत काळात पैशाचा वापर होत आहे. आम्ही हे होऊ नये यासाठी उपाययोजना करत होतो. निवडणुकीत हजार आणि दोन हजाराच्या मोठ्या नोटांचा वापर होत होता ते थांबवण्याचा आम्ही प्रयत्न केला. सुरुवातीला राजनैतिक पार्ट्यांना वीस हजार रुपये कॅश घेण्याची सूट होती. ही सूट सुप्रीम कोर्टाने दिले होती.

मला आठवतं की आम्हाला एक व्यापारी असं म्हणाला होता की आम्ही तुम्हाला धनराशी चेक द्वारे देऊ शकत नाही कारण सत्ता पक्षाला कळेल की त्यांनी आम्हाला पैसे दिलेत. 90 च्या दशकात आम्हाला निवडणूक लढवायला अडचण आली होती कारण आमच्याकडे पैसेच नव्हते. 

ते पुढे असे म्हणाले की या योजनेवर संसदेत चर्चा झाली आहे बिल संसदेत पास झाले आहे आणि आज जे लोक या स्कीमच्या विरोधात बोलतात त्यावेळी हेच लोक त्या योजनेच्या समर्थनात होते. ते म्हणाले की जे लोक आज बोलतात त्यांना उद्या त्यांच्या कृतीचा पश्चाताप होईल जर ते इमानदारीने विचार करतील. 3 000 कंपन्याने या योजनेद्वारा पैसे दिले आहेत. यातल्या 26 कंपन्यांच्या विरोधात ईडीची तपासणी सुरू आहे. यातील 16 कंपन्या अशा आहेत की ज्यांनी ईडीच्या कारवाईनंतर पैसे दिले. यातले 37% कंपन्यांनी बीजेपीला पैसे दिले बाकी 63% कंपन्यांनी विपक्षांना पैसे दिले. 

ही तर मोठी वसुली स्कीमराहुल गांधी Prime Minister Modi Praised Electro Bond | राहुल गांधी म्हणाले ही तर वसुली स्कीम 

Prime Minister Modi Praised Electro Bond | राहुल गांधी म्हणाले ही तर वसुली स्कीम 

पंतप्रधान मोदींच्या मुलाखतीतल्या इलेक्ट्रॉल  बॉण्डच्या दाव्यांवर काँग्रेस नेता राहुल गांधी म्हणाले की ही एक वसुली स्कीम आहे ज्याचे मास्टर माईंड नरेंद्र मोदी आहेत. 

राहुल गांधी मीडियाशी बोलताना म्हणाले, इलेक्ट्रॉल बॉण्ड मध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे नाव आणि तारीख. जेव्हा आपण या दोन गोष्टी पहाल तेव्हा लक्षात येईल की जेव्हा त्यांनी इलेक्ट्रॉल बॉण्ड केला त्याच्या लगेच नंतर एकतर कंपनीला कॉन्ट्रॅक्ट मिळाले किंवा त्यांवर सीबीआय ची जी तपासणी होती ती रद्द करण्यात आली. पंतप्रधान मोदी जी यांची चूक पकडण्यात आली आहे आणि त्यामुळे ते एनआयए ला इंटरव्यू देत आहेत. हा देशातला सगळ्यात मोठा पैसा वसूल करण्याचा स्कॅम आहे आणि ज्याचे कर्ता धर्ता मोदी आहेत. 

विरोध करणाऱ्यांना पश्चाताप होईल या मोदीजींच्या वक्तव्यावर राहुल गांधी म्हणाले की मोदींनी आम्हाला सांगावं की सीबीआयची तपासणी सुरू झाल्यावर लगेच बॉण्ड ची खरेदी होते आणि त्यानंतर लगेच तपासणी रद्द होते याबद्दल मोदींनी आम्हाला समजून सांगावं. 

हा तर बेशरमपणाचा कळसकाँग्रेस  

इलेक्ट्रॉन बॉण्डच्या स्कीम बद्दल मोदीजींनी केलेल्या वक्तव्यावर काँग्रेसने त्यांचा खरपूस समाचार घेतला आहे. हे तर बेशरमपणाचा कळस असून हे सर्व खोटं आहे. पार्टीने सांगितले की इलेक्ट्रॉन बॉण्ड लागू होण्याच्या आधी 20000 रुपये त्या स्वरूपात दिले जाऊ शकत होते. ही स्कीम आल्यानंतर रोख स्वरूपात पैसे देणाऱ्यांची ओळख सांगण्याची अट संपुष्टात आलेली आहे. म्हणजेच पूर्णपणे गुप्त स्वरूपात ही योजना रचलेली आहे. साल 2018 पासून 2024 मधील पूर्ण माहिती अजूनही समोर आलेली नाही.

2018 मध्ये मोदी सरकारने इलेक्ट्रॉनिक बोंडची स्कीम आणली आणि असा दावा केला की निवडणुकांमधील फंडिंग च्या प्रक्रियेमध्ये पारदर्शकता येईल. या कायद्यात असे म्हटले गेले की पैसे देणाऱ्याची ओळख गुप्त ठेवली जाईल. यामुळे हे कळतच नव्हते की कोणत्या पार्टीला कोणी किती पैसे दिलेत तसेच या स्कीम मधून कोणत्या पार्टीला किती पैसे मिळालेत. 

यावर्षी फेब्रुवारीमध्ये इलेक्ट्रॉ बॉण्ड स्कीमला सुप्रीम कोर्टाने असंवैधानिक करार दिला. 

चौकशीतून समोर आलेल्या माहिती नुसार 12 एप्रिल 2019 ते 11 जानेवारी 2024 मध्ये भारतीय जनता पार्टीने एकूण 60 अब्ज रुपयांपेक्षा जास्त इलेक्ट्रॉ बॉण्ड  इन कॅश केले आहेत तसेच या नंतर दुसऱ्या नंबर

Table of Contents

2 thoughts on “Prime Minister Modi Praised Electro Bond | राहुल गांधी म्हणाले ही तर वसुली स्कीम 0”

Leave a comment