google.com, pub-7099045890888503, DIRECT, f08c47fec0942fa0 Now There Will Be A Tough Fight | बारामती मतदारसंघात आणखी एक पवार 0 -

Now There Will Be A Tough Fight | बारामती मतदारसंघात आणखी एक पवार 0

Now There Will Be A Tough Fight | बारामती मतदारसंघात आणखी एक पवार

बारामती मतदारसंघात आणखी एक पवार!!आता होणार चुरशीची लढत

Now There Will Be A Tough Fight | बारामती मतदारसंघात आणखी एक पवार 0

 

बारामती लोकसभा मतदारसंघातील निवडणूक अत्यंत रंजक वळणावर आली आहे. या निवडणुकीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा थेट सामना होणार आहे. पवार कुटुंबातच ही लढत होणार असल्याची चर्चा असतानाच शरद पवार नावाचा एक उमेदवारही मैदानात उतरल्याने रंजक वाढली आहे. अर्थात या शरद राम पवार यांचा पवार कुटुंबीयांशी काहीही संबंध नाही. केवळ नामसाधर्म्य आहे. बघतोय रिक्षावाला पुरस्कृत संघटनेचे अपक्ष उमेदवार शरद राम पवार यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे व तो मंजूर सुद्धा झालेला आहे. सर्व प्रशासकीय बाबींची पूर्तता झाल्यामुळे शरद राम पवार यांचा अर्ज मंजूर करण्यात आलेला प्रत्यक्षात या व्यक्तीचा पवार कुटुंबीयांशी कोणताही संबंध नाही परंतु केवळ नाम साधर्म्यामुळे पवार विरुद्ध सुळे अशा सामन्यांमध्ये आता आणखी एका पवारांची वर्णी लागल्याने निवडणुकीत रंजकता वाढली आहे.

अजित पवारांचा अर्ज बाद

Now There Will Be A Tough Fight | बारामती मतदारसंघात आणखी एक पवार 0

देशभरात निवडणुकीचं वारं वाहू लागलं आहे. त्यामुळे देशातील निवडणुकीचं रणही चांगलंच तापलं आहे. काही ठिकाणी थेट लढत आहे, काही ठिकाणी चुरशीची लढत आहे तर काही ठिकाणी एकतर्फी मुकाबला होताना दिसत आहेत. पण देशाचं लक्ष मात्र, महाराष्ट्रातील एका जागेकडे लागलं आहे. तो मतदारसंघ म्हणजे बारामती. बारामतीत एकाच कुटुंबात लढत होणार आहे. ते कुटुंब म्हणजे पवार कुटुंब. शरद पवार यांची मुलगी सुप्रिया सुळे आणि सून सुनेत्रा पवार यांच्यात मुकाबला होणार आहे. या निवडणुकीत शरद पवार यांनी आपलं बळ लेकीच्या पारड्यात टाकलं आहे. तर अजित पवार यांनी पत्नीसाठी कंबर कसली आहे. या निवडणुकीत पत्नीचा अर्ज बाद झाल्यास दावा कायम राहावा म्हणून अजित पवार यांनी अर्ज दाखल केला होता. मात्र, अर्ज छाननीत अजित दादांचाच अर्ज बाद झाला आहे.

सुनेत्रा पवारांचा अर्ज मंजूर Now There Will Be A Tough Fight | बारामती मतदारसंघात आणखी एक पवार

Now There Will Be A Tough Fight | बारामती मतदारसंघात आणखी एक पवार 0

बारामती लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाने सुप्रिया सुळे यांना उमेदवारी दिली आहे. तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सौ सुनेत्रा अजित पवार यांना उमेदवारी दिलेली आहे. शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे यांनी उमेदवारी अर्ज भरला तसेच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून त्यांच्या पत्नी सौ सुनेत्रा अजित पवार यांनी अर्ज भरला. अधिकृत उमेदवाराचा अर्ज बाद झाल्यानंतर पक्षाकडून उमेदवार असावा म्हणून डमी अर्ज भरण्याची परंपरा आहे. त्यानुसार अजितदादांनीही डमी अर्ज भरला होता. मात्र, अर्ज छाननीत अजित पवार यांचा अर्ज बाद झाला आहे. तर सुनेत्रा पवार यांचा अर्ज मंजूर करण्यात आला आहे.

सुप्रिया सुळे यांचा अर्ज मंजूर

Now There Will Be A Tough Fight | बारामती मतदारसंघात आणखी एक पवार 0

दरम्यान, सुप्रिया सुळे यांचा अर्ज मंजूर करण्यात आला आहे. तर शरद पवार गटाकडून डमी अर्ज भरलेल्या सचिन दोडकेचा अर्ज नामंजूर करण्यात आला आहे. दोडके यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला होता. निवडणूक आयोगाने आज अर्ज छाननीसाठी अनेकांना बोलावलं होतं. एकाच पक्षाचे दोन अर्ज असल्यामुळे एकाच उमेदवाराचा अर्ज मंजूर करण्यात आला. तर डमी उमेदवाराचा अर्ज बाद करण्यात आला आहे. सुनेत्रा पवार यांच्यापाठोपाठ सुप्रिया सुळे यांचा अर्ज वैध ठरल्याने आता दोन्ही नणंद-भावजयांमध्ये थेट लढत होणार आहे.

शरद पवार मैदानात

दरम्यान, ‘बघतोय रिक्षावाला’ संघटना पुरस्कृत उभे असलेले अपक्ष उमेदवार, रिक्षाचालक शरद राम पवार यांचा बारामती लोकसभेसाठीचा अर्ज मंजूर झाला आहे. सर्व बाबींची पूर्तता केल्यामुळे हा अर्ज वैध झाला असून प्रशासनाकडून मान्य करण्यात आला आहे. त्यामुळे बारामतीत पवार घराण्यात निवडणूक होत असतानाच शरद पवार नावाचा व्यक्ती मैदानात उतरल्याने या निवडणुकीची रंगत वाढली आहे.

वंचित बहुजन आघाडीचा सुळे यांना पाठिंबा

दरम्यान, वंचित बहुजन आघाडीने या पूर्वीच सुप्रिया सुळे यांना पाठिंबा दिला आहे. गेल्या निवडणुकीत वंचितने या मतदारसंघातून 50 हजाराच्या वर मते घेतली होती. त्यामुळे या मतांचा सुप्रिया सुळे यांना फायदाच होणार असल्याचं सांगितलं जात आहे. वंचित बहुजन आघाडीने या आधीच सुप्रिया सुळे यांना जाहीर पाठिंबा दर्शवला होता. राजकीय वर्तुळात वंचित बहुजन आघाडीमुळे सुप्रिया सुळे यांना फायदा होणार असल्याची चर्चा आहे. जाणकारांच्या मते वंचित बहुजन आघाडीने मागच्या निवडणुकीत बारामती मतदारसंघातून पन्नास हजाराहून अधिक मते घेतली होती या मतांचा फायदा आता सुप्रिया सुळे यांना होणार आहे.जाणकारांच्या मते वंचित बहुजन आघाडीने मागच्या निवडणुकीत बारामती मतदारसंघातून पन्नास हजाराहून अधिक मते घेतली होती या मतांचा फायदा आता सुप्रिया सुळे यांना होणार आहे.

कधी होणार मतदान?

बारामती लोकसभा मतदरासंघासाठी तिसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे. येत्या 7 मे रोजी हे मतदान होणार आहे. तिसऱ्या टप्प्यासाठी बारामतीसह 11 लोकसभा मतदारसंघात मतदान होईल. तर 4 जून रोजी मतमोजणी होऊन निकाल हाती येणार आहेत. त्यामुळे या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Table of Contents

 

1 thought on “Now There Will Be A Tough Fight | बारामती मतदारसंघात आणखी एक पवार 0”

Leave a comment