Burning Torches Thrown At Each Other | कर्नाटकामध्ये मंदिरात झाले भक्तांचे महायुद्ध
एकमेकांवर फेकल्या जळत्या मशाली कर्नाटकामध्ये मंदिरात झाले भक्तांचे महायुद्ध
कर्नाटकामध्ये मेंगलोरला श्री दुर्गा परमेश्वरी मंदिर स्थित आहे. दुर्गा मातेला समर्पित या मंदिरात हिंदूधर्मियांची विशेष श्रद्धा आहे. हे मंदिर हिंदू धर्मामध्ये खूप खास मानले जाते. या मंदिराला कपिल मंदिरम्हणून सुद्धा ओळखतात. मंदिराची सगळ्यात मोठी विशेषता ही आहे की इथे दरवर्षी एक दुसऱ्यांवरजळत्या मशाली फेकतात. या कृतीची एक खास परंपरा आहे. मंगलोर शहरापासून 30 किलोमीटर अंतरावर स्थित दुर्गा परमेश्वरी मातेचे मंदिर आपल्या अग्नी केली परंपरेसाठी ओळखले जाते. आगीशी खेळणाऱ्या या खेळांमध्ये शेकडो लोक भाग घेतात.
कर्नाटकात ‘अग्नी केली’
फार पूर्वीपासून कर्नाटकामध्ये अग्नी केली चे आयोजन केले जाते. मेंगलोर मधील श्री दुर्गा परमेश्वरी मंदिरामध्ये अग्नी केलीची परंपरा फार पूर्वापारपासून चालत आहे. कपिल मंदिर या नावानेही हे मंदिर ओळखले जाते तसेच कर्नाटकातल्या कानाकोपऱ्यातून भाविक इथे दर्शनासाठी येतात. भाविक भक्तांचे असे म्हणणे आहे की या परंपरेमुळे आमच्या आयुष्यातले दुःख कमी होण्यास मदत होते. तसेच आम्हाला दुर्गा मातेचा आशीर्वाद लाभतो त्यामुळे या परंपरेत कधीही खंड पाडला जात नाही.भाविक भक्तांचे असे म्हणणे आहे की या परंपरेमुळे आमच्या आयुष्यातले दुःख कमी होण्यास मदत होते. तसेच आम्हाला दुर्गा मातेचा आशीर्वाद लाभतो त्यामुळे या परंपरेत कधीही खंड पाडला जात नाही.
अग्नी केली ही परंपरा आतुर आणि कलंदर या दोन्ही गावातल्या लोकांमध्ये खेळली जाते हे पाहण्यासाठी कर्नाटकातल्या कोपरा कोपऱ्यातून लोक येतात. अग्नी केली ही परंपरा एप्रिलच्या महिन्यात आठ दिवस चालते. यात एक दुसऱ्यांवर जळत्या मशाली फेकतात. लांबून पाहिलं तर असं वाटेल की महायुद्ध चाललेले आहे. अंधाऱ्या रात्री जेव्हा हवेत मशाली उडताना पाहतात तेव्हा असे वाटते की जसे काही एखादे मिसाईल हवेत उड्डाण घेत आहे. जर या परंपरेत कोणी जखमी झाले तर लगेचच पवित्र जलाने त्या जखमा धुतल्या जातात. हा खेळ जवळ जवळ पंधरा मिनिटापर्यंत चालतो.जर या परंपरेत कोणी जखमी झाले तर लगेचच पवित्र जलाने त्या जखमा धुतल्या जातात. हा खेळ जवळ जवळ पंधरा मिनिटापर्यंत चालतो.
दुर्गा परमेश्वरी मंदिरात साजरी केली अग्नी केली परंपरा Burning Torches Thrown At Each Other | कर्नाटकामध्ये मंदिरात झाले भक्तांचे महायुद्ध
शनिवारी रात्री 20 एप्रिल ला पुन्हा एकदा दुर्गा परमेश्वरी मंदिरात अग्नी केली चे आयोजन झाले. यामध्ये लोकांनी भगवे असल्या परिधान करून हातामध्ये जळत्या मशाली घेऊन मंदिराकडे धाव घेतली. मशाली हातात घेऊन होणाऱ्या संग्रामाला पाहण्यासाठी लोकांची तोबा गर्दी जमली. दोन्ही बाजूच्या गावांचे दोन गट एकमेकांवर जळणाऱ्या मशाली फेकत होते.मशाली हातात घेऊन होणाऱ्या संग्रामाला पाहण्यासाठी लोकांची तोबा गर्दी जमली. दोन्ही बाजूच्या गावांचे दोन गट एकमेकांवर जळणाऱ्या मशाली फेकत होते.
दोन्ही गावांमध्ये साजरी होते अग्नी केली
कर्नाटकातल्या मेंगलोर मध्ये श्री दुर्गा परमेश्वरी मंदिरात पूर्वापारपासून अग्नी केली ही परंपरा साजरी केली जाते. या परंपरेमध्ये दोन्ही गावातले लोक सहभागी होतात.शेजारी असलेली गावे आतुर आणि कलत्तर यांच्यामध्ये ही परंपरा साजरी केली जाते. नारळाच्या सालीपासून बनवलेल्या मशाली घेऊन लोक मंदिराकडे पोहोचतात आणि पंधरा मिनिटापर्यंत हा मशालींचा खेळ खेळतात. मशाली एक दुसऱ्यावर टाकण्यासाठी पाच वेळाच फेकण्याचा नियम आहे.
स्थानिक लोकांचे म्हणणे आहे की अग्नी केली या परंपरेमुळे दुःख कमी होते. अग्नि केळीची सुरुवात मेष संक्रांति दिवसांच्या पूर्वसंध्येपासून सुरू होते आणि तेव्हापासूनच लोकांची गर्दी मंदिरात व्हायला सुरुवात होते. सुमारे आठ दिवस अग्नी केली हा खेळ दुर्गा परमेश्वरी मंदिरात साजरा केला जातो. या परंपरेमध्ये सहसा कुणाला इजा होत नाही तशी दक्षता घेतली जाते पण तरीही कोणी जखमे झालेच तर मंदिरातल्या पवित्र जलाने त्या जखमा धुतल्या जातात. अशी आख्यायिका आहे की अग्नी केली हा खेळ खेळल्यामुळे माणसांच्या आयुष्यातले दुःख कमी होण्यास मदत होते.
पूर्वा पासून चालत आलेल्या या परंपरेत तेथील ग्रामस्थांनी कोणताही खंड पडू दिला नाही. संध्याकाळच्या वेळेस मंगल स्नान करून भगवे वस्त्र परिधान करून दोन्ही गावातले ग्रामस्थ मंदिराच्या दिशेने प्रस्थान करतात. नारळाच्या सालीपासून बनवलेली मशाल हाती घेऊन ते हा खेळ खेळतात. जवळपास शेकडो लोक या खेळात सहभागी होतात तसेच ही परंपरा पाहण्यासाठी कर्नाटकातल्या कानाकोपऱ्यातून हजारो भाविक या मंदिरात येतात. यंदाच्या वर्षीही 20 एप्रिल ला भव्य आणि दिव्य स्वरूपात ही परंपरा श्री दुर्गा परमेश्वरी मंदिरात साजरी करण्यात आली शेकडो भाविकांनी या खेळामध्ये भाग घेतला होता तसेच हजारो भाविक ही परंपरा पाहण्यासाठी दूरवरून आले होते.
Table of Contents