google.com, pub-7099045890888503, DIRECT, f08c47fec0942fa0 Dubai In Chaos Due To Rain Water | पावसामुळे विमानतळावरील सर्व व्यवस्था विस्कळीत 0 -

Dubai In Chaos Due To Rain Water | पावसामुळे विमानतळावरील सर्व व्यवस्था विस्कळीत 0

Dubai In Chaos Due To Rain Water | पावसामुळे विमानतळावरील सर्व व्यवस्था विस्कळीत

पावसाच्या पाण्याने दुबई अत्यवस्थ…. व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

Dubai In Chaos Due To Rain Water | पावसामुळे विमानतळावरील सर्व व्यवस्था विस्कळीत 0

 

संयुक्त राज्य अमीरात बरोबर खाडीतल्या काही देशांमध्ये अचानक आलेल्या पावसामुळे खूप लोक
मृत्यमुखी पडलेली आहेत. जगातल्या सगळ्यात व्यस्त विमानतळांपैकी एक दुबई विमानतळ आहे परंतु
पावसामुळे विमानतळावरील सर्व व्यवस्था विस्कळीत झालेली आहे. दुबई शेजारील ओमान मध्ये
पावसामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 19 झाली आहे.

बुधवारी दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून
जवळजवळ 300 उड्डाणे रद्द करण्यात आली. दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ जगातल्या जवळजवळ
सर्व प्रदेशांना जोडणारे ठिकाण आहे.
तुफान पाऊस आणि पूर परिस्थिती पाहता देशाबाहेर जाणाऱ्या लोकांची गर्दी दुबई आंतरराष्ट्रीय
विमानतळावर इतकी वाढली की चेकिंग गुरुवारपर्यंत थांबवण्यात आले.

अधिकाऱ्यांनी खाडी देशांमध्ये अजूनही वादळ पाऊस मुसळधार पाऊस होण्याची शंका व्यक्त केली आहे.
अजूनही काही प्रदेशांमध्ये पाणी भरलेले आहे.
संयुक्त अरब अमिरात मध्ये गेल्या 75 वर्षातल्या सर्वोच्च पावसाची नोंद झाली आहे.
दुबईतून मिळणाऱ्या फुटेजमध्ये दिसत आहे की शेख जायत रोड मध्ये पूरग्रस्त प्रदेशात अनेक वाहने
बुडून गेले आहेत. बारा लेन हायवेवर जाम लावला आहे.

प्रवाशी संतप्त

Dubai In Chaos Due To Rain Water | पावसामुळे विमानतळावरील सर्व व्यवस्था विस्कळीत 0

ब्रिटिश नागरिक कॅट आणि अँड्र्यू गोल्डिंग पुरात अडकले आहेत. ते दोघे बारा तासापासून दुबई
आंतरराष्ट्रीय विमानतळावर अडकलेले आहेत. 62 वर्षाचे अँड्र्यू म्हणाले की,"आम्ही इथून निघण्यासाठी
विमानाच्या प्रतीक्षेत आहोत. त्यांची पत्नी कॅट ही दुसऱ्या रांगेत उभी आहे कारण जर अँड्र्यू ला तिकीट
मिळाले नाही तर त्यांच्या पत्नीला दुसऱ्या फ्लाईटचे तिकीट मिळावे. हे दोघेजण कॅटचा साठावा
वाढदिवस साजरे करण्यासाठी दुबईत आले होते.

म्हणाले की ते या प्रवासाला कधीच विसरू शकत नाही.
अँड्र्यू म्हणतात की,"परिस्थिती आमच्या अनुमानापेक्षाही जास्त खराब होती. विमानतळाची व्यवस्था
पूर्णपणे उध्वस्त झाली होती. एअर एमिरेट्स जी दुनियातली सगळ्यात चांगली एअरलाईन आहे ती ही
पूर्णपणे ठप्प झालेली होती. कोणताही कर्मचारी तिथे नव्हता किंवा कोणतीही सूचना आम्हाला मिळत
नव्हती. त्यांच्यामध्ये कोणतीही सुव्यवस्था नव्हती. तसेच कोणतीही माहिती ते आम्हाला देत नव्हते.

मोठ्या कंपन्यांमध्ये असलेले व्यवस्था तिथून गायब झाली होती आणि संपूर्णपणे अराजकता आम्हाला
पाहायला मिळाली.
त्यांनी सांगितले की लोक प्लॅटफॉर्मवर झोपली होती तर काहीजण जमिनीवर पडली होती. सगळीकडे
अन्नपदार्थांचे पाकीट पडले होते आणि खूप घाण साचली होती.

विमानतळाला अवकळा Dubai In Chaos Due To Rain Water | पावसामुळे विमानतळावरील सर्व व्यवस्था विस्कळीत

Dubai In Chaos Due To Rain Water | पावसामुळे विमानतळावरील सर्व व्यवस्था विस्कळीत 0

दुसरे प्रवासी यांनी सांगितलं की लोक कनेक्शन डेक्स वर ओरडत होती आणि गोंधळ सुरू होता. तिथे
कोणताही कर्मचारी उपस्थित नव्हता आणि खूप भयंकर आणि भीतीचे वातावरण होते. लोक
जनावरांसारखी एका छोट्या जागेत कोंबली होती आणि हे खूप अमानवीय वाटत होते. आमच्या पूर्ण
परिवाराने दुपारनंतर अन्न घेतले नव्हते खूप तासानंतर आम्हाला पिण्याची पाण्याची एक बॉटल देण्यात
आली.
या या विमानतळाला दुबई वर्ल्ड सेंट्रल असे म्हणतात. इथे पोहोचलेल्या लोकांनी दुबई आंतरराष्ट्रीय
विमानतळाला अराजकतेचा शिक्का मारला. त्यांनी सांगितले की दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पुरेसे
पाणी आणि अन्नाची व्यवस्था नव्हती.

दुबईमध्ये पावसामुळे एका वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला. त्यांची गाडी पुराच्या पाण्यात वाहून गेली होती.
ओमान मध्ये चौदाशे लोक पावसाच्या पाण्यात अडकले होते त्यांना बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी
पोहोचवले आहे. या लोकांना शाळा आणि सरकारी कार्यालयांमध्ये ठेवले आहे.

तीन मुले आणि ड्रायव्हर यांनाही पुराच्या पाण्यात वाहून जाण्यापासून वाचवले आहे. रविवारी पुराच्या
पाण्यात बस अडकल्यामुळे दहा मुलांचा मृत्यू झाला होता.
या अचानक आलेल्या पावसाला जलवायू परिवर्तन आणि ग्लोबल वॉर्मिंगचा संकेत सांगितला आहे.

दुबईच्या या अवस्थेला कोण जबाबदार?

Dubai In Chaos Due To Rain Water | पावसामुळे विमानतळावरील सर्व व्यवस्था विस्कळीत 0

क्लाऊड सीडींग या पद्धतीने दुबईत पाऊस पाडला जातो. सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे
ढगांमध्ये पावसाचे बीजारोपण केले जाते यालाच क्लाऊड सीडिंग असे म्हणतात. विजाच्या
रूपामध्ये सिल्वर आयोडाइड पोटॅशियम क्लोराइड आणि सोडियम क्लोराईड अशा पदार्थांचा वापर

केला जातो. या पदार्थांना एअरक्राफ्टच्या मदतीने ढगांमध्ये शिंपडले जाते हे पदार्थ आईस
नुकलेटिंग पार्टिकलच्या सारखे काम करतात. त्यामुळे बर्फाचे कण ढगांमध्ये बदलतात आणि
ढगांमध्ये असलेली उष्णता बर्फाच्या कणांना आच्छादित करून पाऊस पडतो. ही प्रक्रिया खूप
वर्षांपासून उपलब्ध आहे आणि संयुक्त अरब अमिरात मध्ये पाण्याची कमी असल्यामुळे याद्वारे
पाऊस पाडला जातो.

प्लंबर च्या एका रिपोर्टनुसार रविवार आणि सोमवारी क्लाऊडसिडींची योजना
बनवली होती. परंतु मंगळवारी ही योजना बनवली नव्हती त्याच दिवशी पूर आला. क्लाऊड शेडिंग
ही तेव्हाच केली जाते जेव्हा हवा आद्रता आणि धूळ यांपासून पाऊस पाडता येत नाही.
गेल्या आठवड्यात पूर्ण खाडी क्षेत्रात पूर्व परिस्थितीचा धोका सांगितला होता.

Table of Contents

1 thought on “Dubai In Chaos Due To Rain Water | पावसामुळे विमानतळावरील सर्व व्यवस्था विस्कळीत 0”

Leave a comment