The Prime Minister Is The Champion Of Corruption | काँग्रेस,समाजवादी पार्टीकडून भाजपचा समाचार
पंतप्रधान हे तर भ्रष्टाचारातील चॅम्पियन:पत्रकार परिषदेत
काँग्रेस,समाजवादी पार्टीकडून भाजपचा समाचार
लोकसभा निवडणुकीसाठी समाजवादी पार्टी आणि काँग्रेस यांच्यामध्ये गटबंधन झालेले आहे यामुळे
गाजियाबाद चे जागा काँग्रेसला मिळाली आहे जिथे अखिलेश आणि राहुल गांधी लोकांकडे मत
मागण्यासाठी पोहोचले आहेत. समाजवादी पार्टी प्रमुख अखिलेश यादव आणि राहुल गांधी यांनी बुधवारी
17 मार्च रोजी सकाळी जॉईंट प्रेस कॉन्फरन्स घेतली त्यात त्यांनी भारतीय जनता पक्षावर सडकून टीका
केलेली आहे.
अखिलेश यादव म्हणाले की इंडिया गटबंधन गाजियाबाद पासून गाजीपुर पर्यंत भारतीय जनता पार्टीला
घरी बसवणार आहे. कारण भारतीय जनता पक्ष फक्त खोटं बोलण्याचं काम करतात लोकांचे काम करत
नाहीत. तसेच राहुल गांधी म्हणाले की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे भ्रष्टाचाराचे चॅम्पियन आहेत. वर्तमान
सरकार मुद्द्यांना अनुसरून बोलत नाहीत.
सपा प्रमुख अखिलेश यादव म्हणाले की या निवडणुकीत भाजपाचे हार निश्चित आहे. उत्तर प्रदेश मधले
गाझियाबाद ते गाजीपुर पर्यंत सगळे उमेदवार गटबंधन केलेल्या पार्ट्यांचे निवडून येणार आहेत. आज
शेतकरी दुःखी आहे तरुण वर्ग त्रस्त आहे. भारतीय जनता पक्षाने आश्वासन दिले होते की की शेतकऱ्यांचे
प्रश्न आम्ही सोडवू.
त्यांना योग्य भाव देऊ परंतु असे काहीच झाले नाही आणि तरुणांना ही रोजगार मिळाला नाही. भारतीय
जनता पक्षाची प्रत्येक गोष्ट खोटी आहे त्यांनी दिलेले कोणतेही आश्वासन पूर्ण केले नाही.
बीजेपी हे तर भ्रष्टाचाराचे गोदाम: अखिलेश यादव The Prime Minister Is The Champion Of Corruption | काँग्रेस,समाजवादी पार्टीकडून भाजपचा समाचार
उत्तर प्रदेशाचे पूर्व मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी इलेक्ट्रॉन बाबत बीजेपीला घेतले आहे. बीजेपी
भ्रष्टाचाराचा गोदाम आहे असे त्यांचे म्हणणे आहे. उत्तर प्रदेश देशातील सर्वात मोठा प्रदेश आहे परंतु हे
डबल इंजिनचे सरकार आहे आणि आता या डबल इंजिनच्या सरकारच्या होर्डिंग मधून नेता गायब होत
आहेत आणि जे नेते होर्डिंग वर राहिले आहेत ते पण निवडणुकीनंतर गायब होणार आहेत.
लुटणे आणि खोटं बोलणे हीच आहे बीजेपी ची ओळख: सपा प्रमुख
गाजियाबाद मधून काँग्रेसचे उमेदवार डॉली शर्माच्या प्रचारासाठी अखिलेश यादव यांनी प्रेस कॉन्फरन्स
मध्ये उत्तर प्रदेश मध्ये झालेल्या पेपर फुटीचा मुद्दा सांगितला. उत्तर प्रदेश मधून बीजेपी ची सफाई
होणार आहे कारण बीजेपी ही लुटमार आणि खोटं बोलणे हीच यांची आता ओळख राहिलेली आहे. पार्टीची
आता ही एकच घोषणा आहे लूट आणि खोटं. उत्तर प्रदेश मध्ये दहा पेपर लीक झाले आहेत. यामुळे लाखो
तरुणांवर प्रभाव पडला आहे त्यांनी सांगितले की मतदानाच्या दिवशी जनतेने सावधान राहुल मतदान
करा तरच भारतीय जनता पक्षाची सफाई होईल.
मुद्द्यांवर बोलत नाहीतच पंतप्रधान: राहुल गांधी
दरम्यान राहुल गांधी म्हणाले की पंतप्रधान मोदी आणि बीजेपी मुद्द्यांवर बोलत नाहीत. ही निवडणूक
विचारधारेची निवडणूक आहे एका बाजूला आरएसएस आणि बीजेपी संविधान आणि लोकधात्रिक
व्यवस्था नष्ट करण्यासाठी प्रयत्न करत आहेत तर दुसऱ्या बाजूला इंडिया गटबंधन आणि काँग्रेस पार्टी
संविधान आणि लोकतंत्र वाचवण्यासाठी आणि त्याचे रक्षण करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
राहुल गांधी म्हणाले लोकसभा निवडणुकीत दोन-तीन मोठे मुद्दे आहेत यामध्ये बेरोजगारी हा सगळ्यात
मोठा मुद्दा आहे आणि दुसरा मुद्दा महागाईचा आहे परंतु भारतीय जनता पक्ष हे जनतेचे लक्ष विचलित
करत आहेत पंतप्रधान किंवा बीजेपी हे कोणीही या मुद्द्यांवर चर्चा करत नाहीत.
इलेक्ट्रॉल बॉण्ड वर राहुल गांधींनी विचारले मोदींना प्रश्न
राहुल गांधी म्हणाले की काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदींनी खूप मोठी मुलाखत दिली जी ठरवून होती .
या मुलाखतीत मोदींनी इलेक्ट्रॉल बॉण्ड समजून सांगण्याचा प्रयत्न केला. व्यवस्था पारदर्शकता
आणण्यासाठी आणि राजनीतीला स्वच्छ ठेवण्यासाठी केलेला आहे. परंतु काँग्रेस नेता राहुल गांधी
म्हणाले की सर्वात आधी हे खरे आहे की सुप्रीम कोर्टाने इलेक्ट्रॉल बाँड रद्द केलेला आहे तसेच जर
तुम्हाला निवडणुकीत पारदर्शकता आणण्याची होती तर भारतीय जनता पक्षाने पैसा देणाऱ्या कंपन्यांचे
नाव फक्त का ठेवले. त्या तारखा गुप्त का ठेवल्या. पंतप्रधान मोदींनी या गोष्टींचे उत्तर द्यावे.
अमेठी मधून राहुल गांधी निवडणूक लढवणार का?
जेव्हा राहुल गांधींना असा प्रश्न विचारला की अमेठी किंवा रायबरेली मधून लोकसभा निवडणूक तुम्ही
लढवणार का यावर ते म्हणाले,;हा सवाल भाजपचा आहे, खूप छान! मला जो काही आदेश मिळेल त्याचं मी पालन करेल. आमच्या पार्टीमध्ये असे सगळे निर्णय काँग्रेस निवड समिती घेते.राहुल गांधींना 2019
मध्ये लोकसभा निवडणुकीत अमेठी मधून पराभव स्वीकारावा लागला होता परंतु ते केरळमधील वायनाड
येथून निवडून आले होते.
भाजप फक्त जिंकणार 150 जागा: राहुल गांधींची भविष्यवाणी
लोकसभा निवडणुकीबद्दल बोलताना राहुल गांधी म्हणाले,;मी जागांबद्दल भविष्यवाणी करत नाही.
पंधरा-वीस दिवसांपूर्वी मी विचार करत होतो की भारतीय जनता पक्षाच्या जवळजवळ 180 जागा निवडून
येतील परंतु मला आता असे वाटते की त्यांना केवळ 150 जागा मिळतील. आम्हाला प्रत्येक राज्यातून
रिपोर्ट येत आहे की आम्ही सुधारणा करत आहोत. उत्तर प्रदेश मध्ये आमचे गटबंधन खूप मजबूत आहे
आणि आम्ही खूप चांगले प्रदर्शन करू.
Table of Contents